शिवसेनेच्या अनुभवी नगरसेवकांना स्थायी समितीतून डच्चू दिल्यानंतर त्यांच्याजागी मनसेतून आयात केलेल्यांना संधी देण्यात आली आहे. आशिष चेंबुरकर आणि मंगेश सातमकरांच्या जागी स्थायी समितीत नवे चेहरे घेण्यात आले आहेत. मनसेतून शिवसेनेत आलेल्या परमेश्वर कदमांची स्थायी समितीच्या सदस्यपदी वर्णी लागलीये. तर दुस-या जागी शिवसेनेच्याच मिलिंद वैद्य यांची नेमणूक करण्यात आलीये. इतर वैधानिक समित्यांमधील रिक्त जागांवरही नव्यानं नेमणूका करण्यात आल्या आहेत. स्थापत्य शहर समिती सदस्यपदी किशोरी पेडणेकर, आरोग्य समितीवर सदानंद परब आणि विधी समितीवर हर्षद कारकर यांना संधी देण्यात आली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

View at DailyMotion